राजिप साळाव शाळा येथे राष्ट्रीय पोषण माह अंर्तगत “किशोर वयीन मुली व विद्यार्थ्यांचे समुपदेशन”
`राजिप शाळा: शाळा साळाव मराठी येथे “राष्ट्रीय पोषण माह” अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी पोषण मूल्य व आरोग्य तर शालेय विद्यार्थ्यांसाठी समतोल आहार या विषयावर डॉक्टर अंकित काटकर यांचे मार्गदर्शन…..
मुरुड तालुक्यातील रा जि प शाळा साळाव मराठी येथे “राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी पोषकमूल्ये व आरोग्यविषयी प्रश्न ,तर शालेय विद्यार्थ्यांसाठी समतोल आहार या विषयावर विशेष कार्यक्रम घेण्यात आला. मुख्या. मान. श्री चंद्रकांत काटकर सर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी निरोगी जीवनशैली टिकून ठेवण्यासाठी आपल्या जीवनात पौष्टिक, पूरक आणि संतुलित आहार भूमिका बजावते असे सांगितले.
आरोग्य सेविका श्रीम शिल्पा ठाकूर यांनी मुलगी वयात येताना दिसून येणारे बदल. वयात येणाऱ्या मुलींनी कोणती काळजी घेतली पाहिजे. वयात येत असताना मुलींच्या स्वभावात, वागण्यात कोणते बदल होतात. मुलींनी कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे. याविषयी मार्गदर्शन केले.तर डॉक्टर अंकित काटकर यांनी समतोल आहाराचे महत्व, समतोल आहाराचे घटक जीवनसत्वे याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. समतोल आहारामुळे शारीरिक शक्ती, मानसिक तत्परता, बौद्धिक प्रगल्भता, रोग प्रतिकार शक्ती व सुदृढ व्यक्तिमत्व आणि रोग्यपूर्ण दीर्घायुष्य जीवन मिळते असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी सन्मा. सौ. निलम पाटील सरपंच, सौ. मनिषा शाळा व्यव. समिती अध्यक्षा मातापालक वर्ग,सहशिक्षिका झेंडेकर मॅडम,आरोग्य सेवक गणेश जैतू, माधुरी कांबळी आशावर्कर इत्यादि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार सौ. रेश्मा धुमाळ मॅडम यांनी केले.
गटशिक्षणाधिकारी सन्मा. बी.के. पाखरे , केंद्रप्रमुखा मोहिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.