शिवराज्य ब्रिगेडतर्फे जयपाल पाटील यांचा सन्मान
रेवदंडा:= अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ,रायगड भुषण जयपाल पाटील यांचा आम्ही कायम सामाजिक कार्य करताना मोलाचा सल्ला घेतो,त्यांचा कार्य करण्याचा आदर्श तरुणांनी घेणे महत्त्वाचे आहे.
ते या वयात हे करीत असलेल्या कार्यामुळेज्येष्ठांसाठी कार्य करीत असलेल्या जागतिक संघटना सीनियर सीनियर वर्ल्ड ने त्यांना 2022 चा शैक्षणिक कार्याबद्दल पुरस्कार दिला. याचा अलिबाग कर म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. शिवराज्य ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव शैलेश पांडुरंग चव्हाण यांनी सांगितले.
अलिबाग येथील कित्ते भंडारी समाज हॉल येथील त्यांच्या कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात जयपाल पाटील यांना शैलेश चव्हाण यांनी पुष्पगुच्छ ,शाल ,श्रीफळ देऊन सन्मान केला.
व आपत्ती व्यवस्थापनाची देशसेवा करतात त्याचे कौतुक करून अभिनंदनही केले. यावेळी त्यांच्यासोबत जयवंत वर्तक, संतोष पालकर, सुरेश गायकर, अनिकेत खोत, कार्यकर्ते होते.