अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रमांना भरघोस मदत करत “सायली बोत्रे” यांचा वाढदिवस साजरा.

कार्ला : मावळ भाजपच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ सायली बोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी भरघोस मदत करत बोत्रे कुटुंबीयांनी वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला असून त्यांच्या या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे.

सध्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे वाढदिवस धूमधडाक्यात साजरे करण्याचे फॅड वाढत चालले असून यामध्ये संबंधित मंडळी नाहक लाखो रुपयांची लयलूट करताना दिसत आहेत.परंतु भाजपचे वेहेरगाव मावळ येथील जितेंद्र बोत्रे व सायली बोत्रे या दांपत्याने अनोखा पायंडा पाडत भाजप महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे यांचा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केला व अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी दिली आहे.
या दांपत्याने कार्ला येथे सुरू असलेल्या “विजय स्तंभ” निर्मितीसाठी रोख अकरा हजार रुपये समितीच्या भाऊसाहेब हूलावळे, अनिल हूलावळे,समीर हूलावळे यांच्याकडे सुपूर्द केले.तसेच धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी २५ हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
सायली व जितेंद्र बोत्रे या दापांत्याने अनावश्यक खर्च टाळत सामाजाचे दायित्व निभावण्यासाठी जे पायंडा पाडला आहे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत असून इतरांनीही त्यांचा आदर्श घेऊन समाजासाठी चांगले कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कार्ला विजय स्तंभ स्मारक समिती व “आपला मावळ न्यूज” परिवारातर्फे सायली बोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.