कार्ला ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक व वादळी ग्रामसभेत “अनधिकृत मदरसा” पाडण्याचा ठराव “एकमुखा”ने मंजूर

कार्ला : ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभेचा “कोरम” पूर्ण होऊन गावात उभारण्यात आलेल्या “मदरसा” इमारतीचे बांधकाम पाडण्याचा ठराव “एकमुखा”ने मंजूर करण्यात आला व याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आज झालेल्या वादळी ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली.

आजपर्यंत कार्ला ग्रामपंचायतीच्या इतिहासात कधीही नियमानुसार किमान आवश्यक असलेली गणसंख्या अर्थात कोरम पूर्ण झाला नव्हता,त्यामुळे सर्वच ग्रामसभा या गणसंख्येअभावी तहकूब कराव्या लागत होत्या परंतु आज मात्र प्रथमच गावातील युवकांनी पुढाकार घेत व एकजुटीचे दर्शन घडवत विक्रमी उपस्थिती दर्शवली.या ग्रामसभेत अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली परंतु सर्वाधिक वादळी विषय ठरला तो अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या मदर्श्याचा.

या बांधकामाविरोधात युवकांनी संतप्त भावना व्यक्त करत सदर बांधकाम पाडण्याची मागणी केली.त्याचप्रमाणे यासंबंधीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करून त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. त्याला अनुसरून समीर हूलावळे यांनी ठराव सूचित केला, तर भाऊ हूलावळे, विष्णु हूलावळे,अनिल हूलावळे यांनी तसेच शेकडो युवकांनी उत्स्फूर्तपणे अनुमोदन केले. ठराव चर्चेला घेतला असता एकमुखाने ग्रामस्थांनी हात वर करून मंजुरी दिली.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष केला.

यावेळी सरपंच दिपाली हूलावळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर ठराव संमत करण्यात आला.यावेळी माजी उपसभापती शरद हूलावळे, माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच दिपक हूलावळे, उपसरपंच किरण हूलावळे यांनी उपस्थितांना आश्र्वस्त करत ग्रामस्थ व गावच्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठींबा असून तत्काळ आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई केली जाईल असे सांगितले.

यावेळी ग्रामस्थ व हिंदू बांधव समितीने जोरदार जयघोष करत आनंद व्यक्त केला. या सभेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. ग्रामसेवक सुभाष धोत्रे, लिपिक शिवाजी म्हाळस्कर,कर्मचारी संतोष हूलावळे, अमोल सुतार यांनी सभेचे नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Chat with us