कार्ला येथील श्री एकवीरा विद्यालयात आ. सुनील शेळके यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन
कार्ला : येथील श्री एकवीरा विद्यालयात आज आ. सुनील शेळके यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

येथील “डॉ. बालाजी तांबे फाउंडेशन” यांच्या वतीने श्री एकवीरा विद्यालयात अद्ययावत संगणक कक्ष प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ. तांबे यांचे सुपुत्र सुनील तांबे, मालविका तांबे तसेच डॉ.तांबे यांचे विदेशातील चाहते व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती वंदनाने सुरुवात करण्यात आली.डॉ.तांबे फाउंडेशन यांच्या वतीने तब्बल वीस संगणक असलेली सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. त्याचा ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी उपयोग होणार आहे.

तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे यासाठी “स्व. गीता एन. सेनानी” व “कै. शांताबाई हरिभाऊ वायकर” यांच्या स्मरणार्थ “सह्याद्री सहाय्यता संघ” यांच्या वतीने पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व जलशुद्धीकण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आ. शेळके यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे, माजी उप सभापती व जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे,सरपंच दिपाली हुलावळे, उप सरपंच किरण हुलावळे, सह्याद्री सहाय्यता संघाचे अध्यक्ष उमेश हुलावळे, अमोल हुलावळे, अनिल हुलावळे, पोलीस पाटील संजय जाधव, ग्राम पंचायत सदस्य सचिन हुलावळे,अभिषेक जाधव, माजी सदस्य भाऊ हुलावळे, अमोल वायकर, बाळासाहेब भानुसघरे, माजी नगरसेवक विलास बढेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश इंगुळकर यांनी केले. तर ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच किरण हुलावळे यांनी उपस्थितांना कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून सांगितली.
.