आदर्श विद्या मंदिर येथे “वस्तु संग्रहालय आपल्या दारी” उपक्रमाचे आयोजन
तळेगाव दाभाडे: आदर्श माध्यमिक विद्यालय येथे “वस्तुसंग्रहालय आपल्या दारी” हा शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारा उपक्रम “तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण सांस्कृतिक सेवा संस्थे”च्या व आदर्श महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

आदर्श विद्या मंदिर मध्ये तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी इतिहासातील शस्त्र: दुर्मिळ वस्तू, नाणी. यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी आयोजित केले होते. या प्रदर्शनात ढाल, तलवार, खंजर, कु-हाडी. दांडपट्टे. वेगवेगळ्या कालखंडातील, दुर्मीळ नाणी पत्र व छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील चित्रफीत इ. १.वी ते १०वी तील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.त्याचबरोबर सगळी शस्त्रास्त्रे आज स्वसंरक्षणासाठी कशी चालवली जातात याचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याची ओळख झाली.. आणि विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना आयुष्यामध्ये शैक्षणिक नवीन संधी कोणकोणत्या आहेत ? हे कळण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. हे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जगदाळे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सांगितले.

या उपक्रमात इ. १ ली ते १० वी चे विद्यार्थी सहभागी झाले होते.या वेळी शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास विद्यार्थ्यांना कळावा, त्या काळातील साधने: शस्त्रास्त्रे, कळावीत. हे छोट्याश्या चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना दाखवून शिवरायांचा इतिहास दाखवला या अनुषंगाने रवींद्र जगदाळे यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना इतिहासातील करिअरच्या नवीन दिशा कोणकोणत्या आहेत? हे सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शिंदे.प्राचार्य संजय देवकर आणि मर्दानी खेळ प्रशिक्षण सांस्कृतिक सेवा संस्थेचे अध्यक्ष. रवींद्र जगदाळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक विभाग प्रमुख सौ. मांडे मॅडम व सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते. तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.