कार्ला येथील श्री एकवीरा विद्या मंदिराचे वार्षिक “स्नेह संमेलन” उत्साहात संपन्न
कार्ला : येथील श्री एकवीरा विद्या मंदिराचे “वार्षिक स्नेह संमेलन” मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
अनेक दशकांची परंपरा असलेल्या कार्ला येथील “श्री एकवीरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स”चा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी अनेक मान्यवरांसह परिसरातील ग्रामस्थांसह पालकवर्ग उपस्थित होते.

समारंभाचा शुभारंभ करताना माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे यांच्याहस्ते शालेय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे यांच्या हस्ते “विज्ञान प्रदर्शनाचे” उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कला व संस्कृतीचे प्रदर्शन करत विविध कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.

या प्रसंगी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, ज्येष्ठ सदस्य सोनबा गोपाळे,सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, पोलीस पाटील संजय जाधव,ग्रा. पं.सदस्य उज्ज्वला गायकवाड, वत्सला हुलावळे, ह. भ. प. अनंता महाराज शिंदे, भाऊसाहेब हुलावळे,मुख्याध्यापक कैलास पारधी, शिक्षक प्रतिनिधी संतोष हुलावळे, शिक्षकेतर प्रतिनिधी बाबाजी हुलावळे, यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.