शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण वर्ग तळेगावात सुरू होणार
:
तळेगाव दाभाडे : दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पासून लायन्स क्लब ऑफ तळेगाव, कडोलकर कॉलनी येथे ऐतिहासिक शिवकालीन मर्दानी खेळ( लाठी-काठी ,भाला ,दांडपट्टा,ढाल – तलवार ई .यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू होत आहेत महाराष्ट्राची लोप पावत असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मावळातील युध्दकला व शौर्यसंस्कृती जतन व संवर्धन करणारी “तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थे”च्या वतीने हे /प्रशिक्षण वर्ग सुरू होत असून या प्रशिक्षण वर्गामध्ये मावळ मधील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिवप्रेमी, पालकांनी वय वर्ष ५पासून पुढे सर्वांना प्रवेश घेता येईल .हे प्रशिक्षण वर्ग आपली महाराष्ट्राची शौर्य संस्कृती असून आपणही या प्रशिक्षणात सहभागी व्हावे. आव्हान संस्थेचे अध्यक्ष शस्त्र व युद्धकला अभ्यासक श्री रवींद्र जगदाळे यांनी केले आहे . इंटरनेट व मोबाईलच्या आभासी युगात सर्वांना उपयुक्त असा हा प्रशिक्षण वर्ग आपल्या मावळ भागात होत असून आपण सर्वांनी यात सहभागी व्हावे .नाव नोंदणीसाठी संपर्क.9552625961
कळावे आपला
श्री रवींद्र भा जगदाळे
(शस्त्र व युद्धकला अभ्यासक,इतिहास संशोधक )
तळेगाव दाभाडे,९५५२६२५९६१