घरगुती गॅस जोडणी तपासणी मोहीमेचा लाभ घ्यावा
एच.पी.गॅस वितरक एस.डी.दुगड यांचेवतीने आवाहन
शिरुर प्रतिनिधी
गॅस सुरक्षा सप्ताह अंतर्गत एच.पी.गॅस कंपनी यांचे वतीने घरगुती गॅस जोडणी तपासणी मोहीम सुरु असुन या मोहीमेस ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन शिरुर तालुका एच.पी.गॅस वितरक एस.डी.दुगड यांचे वतीने करण्यात आले आहे .
या बाबत शिरुर तालुका एच. पी गॅस वितरक एस.डी. दुगड यांचे वतीने पियुष दुगड यांनी सांगितले की, या मोहिमे अंर्तगत एच. पी. गॅस कंपनीच्यावतीने घरगुती जोडणी तपासणीसाठी अधिकृत ओळखपत्र देऊन तपासणीसांची नेमणुक करण्यात आली आहे . कंपनी नियमानुसार पाच वर्षातुन एकदा ही तपासणी करणे अनिवार्य असुन घरगुती गॅस जोडणी तपासणीसाठी २३६ रुपये अधिकृत फार्म फी घेऊन गॅस सिलेंडर, रेग्युलेटर, रबर पाईप, शेगडी याचे लिकेज तपासण्यात येत आहे.
गॅस तपासणी साठी येणाऱ्या तपासणीसांबाबत अथवा काही समस्येबाबत एच . गॅस . शिरूर कार्यालय व हेड मॅकनिक मो .नं.9890463230 या क्रमांकावर संपर्क साधावा . व आपली घरगुती गॅस जोडणी सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी .
तसेच एच .पी . गॅस सुरक्षा कवच अंतर्गत ग्राहकांना एका वर्षासाठी फक्त रुपये ३९९ मध्ये ग्राहकांसाठी सेवा उपलब्ध आहे. त्यामध्ये
एक्सप्रेस रिफिल माध्यमातुन ऑनलाइन डिलिव्हरी बुकिंगच्या २४ तासांच्या आत दिली जाईल. ऑनलाइन बुकिंगच्या २४ तासांच्या आत डिलिव्हरी न केल्यास रु.२० चा कॅशबॅक दिला जातो . गॅस कनेक्शन देखभाल भेट ग्राहकाच्या सोयीनुसार केली जाईल.
एलपीजी कनेक्शनची पूर्ण तपासणी (सिलेंडर, रेग्युलेटर, सेफ्टी होज, स्टोव्ह इ. वर्षातून एकदा अनिवार्य तपासणी.या देखभालीदरम्यान कोणतेही पार्ट बदलण्याची गरज भासल्यास त्याची वास्तविक किंमत आकारली जाईल.
एच . पी . किचन सेफ्टी किट (सुरक्षा गिफ्ट बॉक्स त्यामध्ये एक ज्वालारोधक ऍप्रन, स्पार्किंग नसलेला लाइटर, अग्निशामक, किचन लीक सेन्सर विशेष सवलतीत उपलब्ध आहे. तसेच
किचन संबंधित ग्लास टॉप स्टोव्ह, सेफ्टी होज पाईप साठी, आमच्या अधिकृत वितरकाशी संपर्क साधावा . असे आवाहन शिरूर तालुका एच . पी . गॅस वितरक एस .डी . दुगड यांचे वतीने करण्यात येत आहे .