धारिवाल कुटुंबाकडुन शिरुरला मिठाईचे वाटप
सामाजिक बांधिलकीच्या परंंपरेेचे जतन
शिरुर प्रतिनिधी
दिपावली या सर्वात मोठ्या सणाचा आनंद गोरगरीबांना देखील
साजरा करता यावा तसेच या गरीबांचे तोंड गोड व्हावे म्हणून येथील माणिकचंद उद्योग समुहाचे प्रसिध्द उद्योगपती व शिरुर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश
धारिवाल यांनी शहरात रहाणाऱ्या गरीब कुटुंबांना तसेच सर्टिफाईड हायस्कूल येथे मिठाई वाटप करून धारिवाल परिवाराकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या सामाजिक बांधिलकीच्या परंंपरेेचे जतन करत दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,आदित्य पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद धाडीवाल,माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे,विठ्ठल पवार,सचिन धाडीवाल,संजय देशमुख,विनोद भालेराव,दादाभाऊ वाखारे,प्रविण दसगुडे,निलेश लटांबळे,अबिद शेख, अशोक पवार,संतोष आंबेकर,मुजफ्फर कुरेशी,बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख मयुर थोरात,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,शिवसेना मंडळ ट्रस्टचे मनसुख गुगळे,सुभाष गांधी,प्रकाश बाफणा,दिपक तातेड,रंजन झांबरे, योगेश जामदार,विशाल जोगदंड,मयुर नहार यांसह उपस्थित होते.
दिवाळी सणाचा आनंद गरीबांना देखील साजरा करता यावा व गरीब कुंटूंबातील नागरिक
या मोठ्या सणाच्या आनंदा पासून वंचित राहु नये या उद्देशाने व
सामाजिक बांधिलकी जपत गरीबांच्या चेहऱ्यावर देखील हसु
फुलविण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून दानशूर प्रसिध्द उद्योगपती माजी
नगराध्यक्ष रसिकलाल धारिवाल यांचे कुंटूंब दिपावलीच्या दिवशी
मिठाई वाटप करुन करत असून दातृत्वाचा हा वारसा अखंबडीतपणे सुरू ठेवत दिपावलीच्या दिवशी
सकाळपासूनच सभागृहनेते प्रकाश धारिवाल व आदित्य प्रकाश धारिवाल यांनी पायी जाऊन स्वतः शहरातील गरीबांच्या घरी जाऊन मिठाई वाटपाची परंपरा अबाधित ठेवली आहे.