ब्रिटानियाच्यावतीने बोनस व मिठाईचे वाटप
तर्डोबाचीवाडीतील थापेमळा ता.शिरूर येथे ब्रिटानिया दुध कंपनीचा व व्यंकटेश दुध केंद्र यांच्यावतीने दुध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व मिठाई वाटप करण्यात आले.
थापेमळा येथे ब्रिटानिया कंपनीचा दुध संकलन केंद्रावर पत्रकारांच्या हस्ते बोनस व मिठाई वाटप करण्यात आलेल्या या कार्यक्रमास रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ब्रिटानिया कंपनीचे आधिकारी राकेशकुमार,वरिष्ठ पत्रकार नितीन बारवकर,संतोष शिंदे,सतिश धुमाळ,अर्जुन बढे,मदन काळे,दीपालीताई काळे,भगवान श्रीमंदीलकर आदिंसह शेतकरी उपस्थित होते.
ब्रिटानिया कंपनीच्यावतीने एक वर्षात दुध संकलन केंद्रात जास्त दुध संकलन करणाऱ्या तीन जास्त बोनसधारक पशुपालक वैभव कर्डिले,भाऊसाहेब शेवाळे,राजाराम वाळके यांची निवड करण्यात आली असून आगामी काळात ब्रिटानिया कंपनीस दुध घालणारा प्रत्येक शेतकऱ्याची मेडिकल पॉलीसी व सीएसआर द्ववारे कंपनीच्या दुध उत्पादक शेतकरी यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यात येणार असल्याचे रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ब्रिटानिया कंपनीचे आधिकारी राकेशकुमार यावेळी बोलताना म्हणाले.
थापेमळा येथील संकलन केंद्रावर तर्डोबाचीवाडी,कर्डे,गोलेगाव सरदवाडी,कर्डीलवाडी,बाभुळसर,कारेगाव,रामलिंग,लंघेवाडी आदी गावांतुन प्रतिदिन १५०० लिटर दुध संकलन केले जात असल्याचे प्रस्ताविक करताना व्यंकटेश दुध संकलन केंद्राचे चेअरमन संभाजी कर्डिले म्हणाले.आभार सुरज कर्डिले यांनी मानले.